कॉल ऑफ दी वाइल्ड
जॅक लंडन. एकोणिसाव्या शतकात परदेशात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या लेखकांपैकी एक. अलास्कामधल्या सोन्याच्या शोधमोहिमांच्या पार्श्वभूमीवरची बक नावाच्या कुत्र्याची साहसकथा म्हणजेच त्याची १९०३ साली प्रकाशित झालेली कादंबरी - कॉल ऑफ दी वाइल्ड. जिने त्याला अफाट प्रसिद्दी मिळवून दिली. जॅक लंडन लिखित या कादंबरीचा मराठी माधव जोशींनी अनुवाद केलेली कादंबरी देखील उपलब्ध आहे.
१८९० च्या सुमारास युकाँन कॅनडा मध्ये सोन्याच्या शोधात असलेला जो गदारोळ होता त्यावर आधारित याची कथा आणि या कथेचा नायक आहे एक "बक" नावाचा श्वान. जो बाकीच्या कुत्र्यांपेक्षा अंगकाठीने एकदम मजबूत आहे. मग त्याचा सुखवस्तू घरातून निघून युकाँन पर्यंतच चा झालेला प्रवास आणि त्याला स्वतःला सापडेला तो.
नुकताच २१ फेब्रुवारी ला याच्यावर असलेला चित्रपट रिलीज झाला. Chris क्रिस सैंडर्स निर्देशित या चित्रपटात Harrison Ford सारखा हॉलीवूडचा स्टार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. परंतु नवीन आलेल्या या फिल्म मध्ये "बक " मात्र ऍनिमेटेड आहे जी याची कमकुवत बाजू असली तरी एका श्वानाच्या नजरेने झालेला हा प्रवास मात्र एक शानदार आणि वेगळा अनुभव देऊन जातो.
१९७२ साली आलेल्या फिल्म मध्ये मात्र "बक " ची भूमिका मात्र एका खऱ्या श्वानाने निभावली आहे. कुतूहल म्हणून मी तो ही पहिला. आत्ताच्या नवीन चित्रपटात टेकनॉलॉजी चा वापर करून "बक " चे इमोशन्स जे दाखवले आहेत ते उत्तमच आहेत. हि गोष्ट मात्र आपल्याला जुन्या चित्रपटात पाहू शकत नाही. आत्ताच्या नवीन चित्रपटात थोडे बदल केले असले तरी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे.
जाता- जाता जॅक लंडन जे म्हणाला त्याचाच अनुवाद...
माणसाने माणूस म्हणून न मिरवता एक माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. अनंत काळ एक निद्रिस्त तारा होऊन राहण्यापेक्षा मला एका क्षणाची उल्का होऊन पडायला आवडेल.
The proper function of man is to live, not to exist. I shall not
waste my days in trying to prolong them. I shall use my time.
I would rather be a superb
meteor, every atom of me in magnificent glow, than a sleepy and permanent planet.
No comments:
Post a Comment