महादजी शिंदे स्मृतीस्थळ (शिंदे छत्री )
पुण्याच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि
सांस्कृतिक ठेविंमध्ये भर घालणारे
एक ठिकाण म्हणजे
वानवडीची शिंदे छत्री.
सुंदर वस्तू आणि
रेखीव स्थापत्त्य हे याचे
वैशिष्ट्य. थांबा! छत्री
हे नाव ऐकून
थोडं वेगळं वाटतंय
ना! पण या वस्तूचा आणि छत्रीही
काय संबंध आहे
असं नाव का ठेवलं असावं
हे पाहण्यासाठीच मी
खास या वेळेला
वानवडीला निघालो. वानवडी हे
पुणे शहराच्या कोणत्याही
भागातून सहज पोहोचता
येण्याजोगे ठिकाण आहे.
तिथेच आहे हि शिंदे छत्री.
महादजी शिंदे यांचा
जन्म हा इ.स.
१७३० आणि मृत्यू
: १२ फेब्रुवारी १७९४. हे
पेशवाईतील एक मुत्सद्दी
होते. महादजी शिंदे
यांचे नाव मराठ्यांच्या
इतिहासात शिवाजी महाराज,
संभाजी महाराज, महाराजा
रघुजी भोसले यांच्यानंतर
महान सेनानी म्हणून
आदराने घेतले जाते.
इंग्रजांकडून मानाने यांना
द् ग्रेट मराठा
असे म्हटले जात
असे. पानिपतच्या तिसऱ्या
लढाईनंतर मराठा साम्राज्याला
पुन्हा उभारी मिळवून
देण्याचे काम जर
कुणी केले असेल
तर ते म्हणजे
महादजी शिंदे यांनीच.
पहिल्या इंग्रज-मराठा
युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही
लढायांमध्ये निर्णायक पराभव केला
व इंग्रजांना तह
करण्यास भाग पाडले
होते. त्यामुळे त्यांच्या
निधनापर्यंत मराठा साम्राज्याला
स्थैर्य लाभले. त्यांनी
वयाच्या दहाव्या वर्षापासूनच
रणांगणावर आपले अस्तित्व
दाखवण्यास सुरुवात केली होई.१७४५ ते
१७६१ दरम्यान ( जो
मराठ्यांचा राज्य विस्तारातील
सुवर्णकाळ मानला जातो)
त्या काळात महादजी
शिंदे यांनी जवळपास
५० लढायांचे नेतृत्व
केले होते असे
म्हणतात. मालव, राजपुताना,
बुंदेलखंड,१७४७, मारवाड
१७४७ व हिम्मत
नगर १७४८. ब्रिज,
दोआब, रोहिलखंड, दिल्ली
कुंजपूर तसेच पानिपतच्या
तिसऱ्या लढाईत हिरिरीचा
सहभाग होता. यातील
महादजींच्या महत्त्वाच्या लढाया म्हणजे
चंद्रावती गंज १७४६,
फतेहाबाद १७४६, बडी
साद्री.
मल्हाराव होळकरांच्या साथीने शिंदे
यांनी अनेक राजपूत
संस्थाने मराठा साम्राज्याखाली
आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर,
लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग
ही मराठा साम्राज्याला
जोडली गेली. तसेच
जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या
राजपूत राज्यांनी मराठा
वर्चस्व मान्य करून
टाकले. मथुरा हे
मुघल सत्तेखाली होते
ते मराठा अखत्यारीत
आणून त्यांनी तेथील
काही हिंदू मंदिरांचा
जीर्णोद्धार केला. शिंद्यांचा
अधिपत्याखाली मथुरेला संस्कृत शिक्षण
केंद्र तयार झाले.
जानेवारी १७५८ मध्ये
महादजी यांनी ग्वाल्हेर
येथे शिंद्यांचे राज्य
बनवले आणि ग्वालियर
राज्याची स्थापना केलीअश्या या
१८ व्या शतकातील
मुत्सद्दी महादजी शिंदे
यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेले हे
स्मारक. याला महादजी
शिंदे यांचं समाधी
स्थळ असे देखील
म्हणतात. आता याला
छत्री हे नाव का पडलं
असावं याचा एक अंदाज
बांधला तर
असं समजतं
कि, त्या वेळेला
कोणीही थोर सेनानींच्या
भेटीला जर कोणी येत असेल
तर एक शिष्टचार
म्हणून आणि त्या
सेनानींच्या सन्मानार्थ आपल्याकडील असणारी
छत्री हि मिटूनच
आत मध्ये प्रवेश
करावा लागत असे
जरी पाऊस पडत
असेल तरी सुद्धा.
या एक शिष्टचाराचा
भाग म्हणून प्रचलित
झाला असावा आणि
त्यावरूनच "शिंदे छत्री
" हे नाव प्रचलित
झाले असावे.
राजस्थानी शैलीने बांधकाम
केलेली ही वास्तू,
'वास्तू-हर' शास्त्राप्रमाणे
बांधली आहे. मंदिरावर
पाहिल्यास आपल्याला ऋषी-मुनींचे
पुतळे पिवळ्या खडकातून
कोरलेले दिसतात . मंदिराचा
हॉल हा मोट्ठा
असून त्यात शिंदे
घराण्यातील सदस्यांचे तैलचित्र लावले
आहेत. महादजी शिंदे
यांची समाधी मंदिर
माधवराव शिंदे यांनी
आठवण म्हणून १९६५
साली उभारण्यात आले.
समाधी त्याच जागेवर
उभारण्यात आली आहे
जिथे महादजी शिंदे
यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले
होते. खरं तर जी
आत मध्ये शिरल्यावर
जी भव्य वस्तू
दिसते तिथे आहे
मूळ शंकराचे मंदिर
आणि बाहेर परिसरात
आहे महादजी शिंद्यांची
समाधी. तिथेच महादजी
शिंदेचा मुखवटा ठेवण्यात
आला आहे. हे मंदिर स्वतः
महादजी शिंदे यांनीे
१७९४ साली बांधले
होते.
परिसरात आत मध्ये
शिरल्यावर एक सुखद
गारवा जाणवतो.
मंदिराचे दगडामध्ये उत्कृष्टपणे राजस्थान
पद्धतीने कोरीव काम
केलेले आहे. मंदिराची
इमारत हि दोन मजली आहे
आणि आतील बाजूने
छज्जा आहे. वर जाणारा जिना
हा मोडकळीस आल्याने
कोणालाही जाण्यास परवानगी नाही.
मंदिराच्या मागील भिंतीवर
देवाची मूर्ती कोरलेली
आहे. भिंतीवर काही
फुलं सुद्धा
कोरलेली दिसतात . मंदिराचा
कळस खूप सुंदर
आहे. मुख्य कळसच्या
चारी बाजूला लहान-लहान कळस
आहेत ते मंदिराची
सुंदरता वाढवतात. मंदिराचे
खांब सुद्धा नक्षीदार
आहेत. भिंतीला झरोखे
देखील आहेत. तेथील
असणाऱ्या रंगीत खिडक्या या
त्याची सौंदर्यता वाढवतात.
खांबांवरील कमानीवर हि सुद्धा
उत्कृष्ट कोरीवकाम केले आहे.
गर्भग्रहाच्या छतावर सुंदर
चित्र काढलेली आपल्याला
दिसतात . मंदिराच्या छतावर चारी
बाजूने मूर्ती बसवलेल्या
आहेत. समोरून पाहिल्यास
महादेव मंदिर न वाटता हा
एक सुंदर महालच
वाटतो. हीच याची
विशेषतः . मंदिरात फोटो काढण्यास
मनाई आहे. अशी
हि वस्तू पाहून
कोणाचाही मन प्रसन्न
झाल्याशिवाय राहणार नाही.
या स्मारकाच्या भोवती
संरक्षक भिंत
बांधण्यात आली आहे.
मंदिर परिसरात असलेल्या
झाडांवरती आपल्याला
राघू -मैनेचा वावर
हमखास दिसतो. त्यांची
गम्मत पाहता-पाहता
वेळ कसा जातो
हे कळतही नाही.
अशी हि शिंदे
छत्री वास्तुकलेचा एक
उत्तम नमुना आहे
आणि आपल्या पूर्वजांची
एक आठवण म्हणून
शिंदे छत्रीस एकदा
तरी भेट जरूर
द्यावी.
इतिहास संदर्भ: सौजन्य विकिपीडिया
© Mayur H. Sanap
No comments:
Post a Comment