About me






माझ्याबद्दल थोडेसं.. 

मी एक स्वच्छंदी. पर्यटनाची आवड असलेला. Life is a beautiful journey. Enjoy the ride. आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे त्याचा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे या उक्तीचा मी. बहुरंगी बहुढंगी. व्यवसायाने संगणक अभियंता असलो तरी रमलो तो नेहमी निसर्गाच्या सान्निध्यातच. 

माझा जन्म रायगडचा. त्यामुळे साहजिकच गड-किल्ल्यांशी नातं हे जन्मापासूनच जोडलेलं राजांचा इतिहास, त्यांचे गडकिल्ले त्यांची विशेषतः ,त्यातून निर्माण झालेली दुर्गभ्रमंती ची आवड आणि त्याला लिखित स्वरूपात मांडण्याचं काम केलं ते ब्लॉग च्या स्वरूपात. त्यात पर्यटनाची असलेली आवड त्यामुळे भटकंती हा आवडीचा विषय. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते हे लहानपणीच शाळेत शिकवलेले अगदी मनावर बिंबवलेलं. त्यामुळे आपल्या माहिती असलेल्या ऐतिहासिक, स्थळ-काळ स्वरूपातल्या गोष्टी ब्लॉग च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचाव्या फक्त हाच हेतू.  
लिखाणाची आवड तर लहानपणापासूनच होती. त्यातच मग काही लेख लोकप्रभा मध्ये प्रकाशित झाले तेच या ब्लॉग वर सुद्धा आहेत. मग प्रतिलिपी वर काही लिखाण केलं आणि त्यातूनच पुढचा प्रवास येऊन ठेपला तो किंडल पर्यंत. माझी पहिली भयकथा "टिंडर" हि लोकप्रिय झाली. ती तुम्हाला प्रतिलिपी आणि किंडल या दोन्ही माध्यमावर वाचायला मिळेल. 

लोकप्रभा, प्रतिलिपी आणि किंडल करताना हा प्रवास आता कुठपर्यंत घेऊन जातोय पाहूया....

No comments: