ATLAS MOTH
भारतातलाच नव्हे तर जगभरातला सर्वात मोठा पतंग म्हणून ATLAS MOTH ची ख्याती आहे. जगभरातला नावलौकिक असलेला; पंख उघडले असता साधारणपणे १० ते ११ इंच इतका भला मोठा आकाराचा पतंग माझ्या गावी गणपतीला गेलो असताना मला बघायला मिळाला. हा पतंग ठाण्यात-मुंबईतील जंगलात सापडल्याच्या नोंदी आहेत.
विशेष म्हणजे हा एवढा मोठा पतंग (फुलपाखरू) गेली काही वर्षे गणपतीच्या पहिल्या दिवशी माझ्या मामाच्या घरी (माणगाव ला ) येतो आणि गणपतीच्या बरोबर मुकुटावर जाऊन विराजमान होतो & नंतर दुसऱ्या दिवशी मुकुटावरची जागा सोडून देतो. आम्हाला याचे फार नवल वाटते.
Short Information about Atlas Moth:
Atlas Moth चे पंख उघडले असता त्याचा आकार सर्वसाधारणपणे ४०० चौरस.से.मी. (६२ चौरस इंच) इतका अवाढव्य असतो. त्याचे वरचे पंख हे अतिशय देखणे असून ते गर्द मरून-तपकिरी रंगाचे असतात. पंखावर हिरव्या-पोपटी रंगाची छोटी बोर्डर असते.
वरच्या दोन पंखावरील टोकाची नक्षी निट बघितल्यास सापाच्या डोक्याचा आकार त्यावर दिसतो आणि म्हणूनच हॉंगकॉंग इथे या पतंगाला Snake Head Moth म्हणजेच सापाच्या डोक्याचा पतंग म्हणून नाव देण्यात आले आहे. Atlas Moth मध्ये मादी साधारणपणे २.५ मी.मी जाडीची अंडी झाडांच्या पानाखाली घालते. साधारणपणे २ आठवड्यानंतर त्यातून अळी बाहेर पडते. या अळ्या साधारणपणे ४.५ इंच इतक्या लांबीच्या झाल्यानंतर ते कोशामध्ये अवस्थांतर करतात आणि ४-५ आठवड्यानंतर प्रौढ पतंग बाहेर पडतो. जगभरातला मोठा आणि देखणा पतंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पतंगाचे आयुष्य हे केवळ १ ते २ आठवडे इतकेच असते; कारण प्रौढावस्थेत त्याला तोंड नसल्याने त्याला काहीही खाता येत नाही हे कटू सत्य आहे.
Regards,
Mayur
8 comments:
मयुर आश्चर्य आहे पण हे खर आहे का दरवर्षी गणेश चतुर्थी ला येतो ..........आणि खूप सुंदर माहिती आहे खूप छान
ho re. salag 3 warsha alela.. let's see in this year
खूप छान आणि नेलाईची माहिती दिलीस सुंदर😍
https://www.facebook.com/groups/346407323039858/permalink/346407346373189/?app=fblकिटक पक्षी निसर्ग प्रेमींनी ग्रुप जॉईन करावा🐞🦋🐜🕊️🐛👈🙏
Mayur me ek entomologist aahe mala me butterfly aani moth study kartoh mala thodishi mahiti havi aahe maza number detoi pls mala contact karsheel ka ?
9082760635
Mayur me ek entomologist aahe mala me butterfly aani moth study kartoh mala thodishi mahiti havi aahe maza number detoi pls mala contact karsheel ka ?
Madhyantari maze blog kade durlaksh zale hote. notification band asalyane tumchi comment wachli geli naahi. tyabaddal kshamaswa. Parantu apnas sangu ichchito ki mi koni nisargashastr tadnya naahi. mazya swanubhaw ani wachnat je kahi yete tyachi shahanisha karun mi te mazya blog war post karat asto. tarihi apnas mazyakdun kahi madat honar asel tar naakich mala anand aahe. apan mala FB messengerwar contact kru shakta.
dhanyawad.
Post a Comment