सुतार पक्षी


सुतार पक्षी
साळून्कीच्या आकाराएवढा, म्हणजेच २५ ते ३२ से.मी. एवढा हा पक्षी असतो. त्याच्या देखण्या रंगामुळे आणि तितक्याच देखण्या चोचीमुळे एकदा बघितला तरी तो चांगलाच लक्षात राहतो. पुत्रकुळातील हा एकमेव प्रतिनिधी आहे. आपल्या ठाण्य-मुंबईत हा पक्षी सहजासहजी दिसत नाही. मला मात्र हा पक्षी जवळून बघण्याचे भाग्य लाभले तेही माझ्या रायगड  जिल्ह्यात. १ जानेवारी २०१२ ला अलिबाग ला गेलो असताना तिथे मला याचे जवळून दर्शन झाले. तिथे जो मी सुतार पक्षी बघितला तो colorful होता, याच्या आधी  मी फक्त तांबूस रंग असलेला (एक रंगी) सुतार पक्षी बघितला होता, जो साधारणपणे आढळतो.
(Watch Video: http://www.youtube.com/watch?v=7_NUs9hKMC0&feature=plcp)

पण खाली फोटोत दाखवलेला सुतार पक्षी दिसणे खरेच भाग्य!.





सुतार पक्ष्याचा मुख्य रंग पिंगट असतो. त्याच्या पाठीवर,पंखावर आणि शेपटीवर झेब्रा प्राण्यासारखे काले-पांढरे पत्ते असतात. त्याच्या डोक्यावर पिसांचा तुरा असतो. या तुर्याची खासियत म्हणजे सुतार पक्ष्याला तो उघडता किवा मिटता येतो. सुतार पक्ष्याची चोच लांब किवां बाकदार असते. गावाजवळची माळराने, गवताळ भाग, तसंच जंगलात हे पक्षी हिंडताना दिसतात. मात्र त्याच्या रंगामुळे ते निसर्गात चटकन दिसत नाहीत.
सुतार पक्ष्याचं मुख्य अन्न हे अळ्या तसंच अळ्यांचे कोश आहे. या अळ्यांच्या शोधात खरंतर हे पक्षी जमिनीवर किंवा लाकडामध्ये चोच आपटत व पालापाचोळा दूर करीत असल्याचं चित्र पाहायला मिळतं.
त्यांची चोच त्यांना त्यांचं भक्ष्य शोधायला मदत करते म्हणूनच निसर्गाने त्यांना लांब चोचीची देणगी दिली आहे.




जमीन उकरताना ते पार गमतीषित दिसतात. त्यांचा तुरा हा त्यावेळी मिटलेला असतो आणि हा मिटलेला तुरा एखाद्या शेंडीसारखा दिसतो.





 हा  पक्षी  सहसा जोडीने किंवा टोळीने राहतो. याचे गाणे म्हणजे हु....पो.....किंवा हु....पो.....पो....असा आवाज असतो. याच आवाजावरून याला इंग्रजीतले ‘हुप्पो’ हेनाव पडले असावे. त्याचे हे गाणे एकसारखे आणि वेळेला दहा मिनिटे असते. झाडांच्या ढोलीत, भिंतींमधल्या भोकात वा छपराच्या भोकात हा घरटे तयार करतो.

© Mayur H.Sanap 2012

10 comments:

Unknown said...

बढिया सर जी खुप छान माहिती.

MAyur said...

धन्यवाद.

Rahul Kamble said...

सर तुमचा contact मिळेल का? थोडं confusion होतं आणि थोड़ी माहिती हवी होती please share करा

MAyur said...

please contact me on FB messenger..

Unknown said...

Very very nice app

Unknown said...

Very useful

Unknown said...

सुतार आणि हुपो किंवा हुडहुड हे एकच कुळातले आहेत का? आणि एकच प्रकार अहेका?

Growyourgyan said...

Visit my site

Unknown said...

सुतार पक्षी अन्न कसे मिळवतो

MAyur said...

सुतार पक्ष्याचं मुख्य अन्न हे अळ्या तसंच अळ्यांचे कोश आहे.
सुतार आणि हुपो किंवा हुडहुड हे एकच कुळातले नाहीत.