तपोभूमी कनकेश्वर





कनकेश्वर






अलिबाग तालुक्यातील श्री क्षेत्र कनकेश्वर हि तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक ऋषीमुनी व शिवभक्त येथे आराधना, साधना आणि तपश्चर्या करण्यासाठी वास्तव्य करीत असत. असें म्हणतात कि निसर्गाच्या सान्निध्यात परमेश्वराचे अस्तित्व असते आणि जो त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो त्याला त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. निर्बिड जंगलाचा परिसर असलेले हे मंदिर अलिबागच्या ईशान्येस १२ कि.मी. वर एका निसर्गरम्य अशा डोंगरावर वसलेले आहे. समुद्र सपाटी पासून उंची सुमारे ५००० फुट.   अनेक दिवस नित्याच्या पाठी लागून शेवटी तो तयार झाला. माझा जन्म हा सोमवारचा असल्याने लहानपणा पासूनच मला पशुपतीनाथां विषयी फार प्रेम.. मग कुठेही शिवालय दिसले तरी मी त्याचे दर्शन घेतल्याशिवाय रहात नाही.



कनकेश्वराच्या दर्शनाला जाणार म्हणून सकाळी लवकरच थंडीतूनच निघालो.  हळूहळू वडखळ, ईस्पात असें करत कधी कनकेश्वराच्या पायथ्याशी पोहोचलो कळलेच नाही. या स्थळाचे नाव कनकेश्वर पडण्याचे कारण म्हणजे शिवाने कनकासुर  नामक राक्षसाचा वाढ केला होता अशी आख्यायिका सांगितली जाते. शिवालयात पोहोचण्यासाठी सुमारे ७०० पायऱ्या वर चढून जावे लागते. या पायऱ्या १७४४ साली सरदार “ रघुजी आंग्रे” यांचे दिवाण “ गोविंद रंगदास” यांनी बांधल्या.  वर जाणाऱ्या पायऱ्या जमिनीलगत समांतर असल्याने आबालवृद्ध अगदी सहज दर्शनासाठी जाऊ शकतात.




सुरुवातीलाच एका मार्बल मध्ये मंदिराची माहिती आणि विशेष सूचना कोरलेली आहे. अशी पायऱ्यांची माहिती देणारा मार्गदर्शक आपल्याला आपल्याला बहुतेक टप्प्यांवर दिसतो.







कुठलाही विशेष दिवस नसल्यामुळे भक्तांची फारशी वर्दळ नव्हती; श्रावणी सोमवारी विशेषतः फार गर्दी असते. गप्पा मारत ..थोडेसे फोटोसेशन J करत नागोबाच्या टप्प्याला आम्ही पहिली विश्रांती घेतली.









काही अंतर चढल्यावर कनकेश्वराची पाउल खूण असलेली “देवाची पायरी” आपल्याला प्रथम दर्शन देते. थोड्याच वेळात आपण गायमांडी या दुसऱ्या विश्रांतीस्थानापर्यंत पोहोचतो. तिथून कठिण चढ समाप्त होतो.










गायमांडीचा टप्पा म्हणजे एका खडकाच्या खळग्यात गायीची पावले असून मुर्ती आहे. तसेच बाजूला ५ शिवलिंगे आहेत. एका गुराख्याच्या गायीच्या स्मरणार्थ बांधलेली हि जागा आहे असे येथील स्थानिकांकडून समजते. तिथून जवळच पिण्याच्या पाण्याची ही सोय केलेली आहे. तेथील थंडगार पाणी पिऊन आपला आत्मा शांत होतो; त्याची चव जणू काही अमृतासमानच! पुढे निर्बिड जंगलातून जाताना वाटेत पालेश्वराचे मंदिर लागते. याची विशेषतः म्हणजे याला फक्त पालाच वाहतात. येथून थोड्याच अंतरावर आपल्याला कनकेश्वराचे मंदिर दिसते. बाजूला असणाऱ्या प्रशस्त विहिरीला सभोवती जाळी मारून बंदिस्त केलेली आहे. कदाचित स्वच्छता/सुरक्षेच्या कारणास्तव केली गेली असावी. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच वानरसेना आमच्या स्वागताला तयार होतीच. आपण त्यांच्या वाटेला गेलो नाही तर तसा त्यांचा काही त्रास नाही.. हां पण; जर तुमच्या हातात प्रसाद किंवा खाण्याचे कही समान वगरे असेल तर जरा सावधच! कारण माझ्या हातातला प्रसाद चक्क दोनदा गायब झाल्यावर याचा मला चांगला अनुभव आला होता. मग काय... रिकाम्या हातानेच कनकेश्वराच्या दर्शनासाठी आत प्रवेश केला. त्यापूर्वी प्रवेश द्वारावरच्या भिंतीवर कोरलेले २ द्वारपाल आपले लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. जसे अगदी जय-विजयचं.  





गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगाला मनोभावे नमस्कार केला, एक मिठी मारली आणि मनात खूप भाव-भावनाचे तरंग उसंबळून आले. नाथांच्या “धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला ” या ओळी नकळतच ओठातून बाहेर आल्या.
मुख्य मंदिराला लागूनच “राम सिद्धीविनायक” देवस्थान आहे. त्याची संपूर्ण माहिती तेथील एका फलकावर लावलेली आहे. श्रीमंत परमहंस परिव्राजकाचार्य लंबोदरानंद स्वामी यांनी या मंदिराची स्थापना १८७६ साली केली आहे. मंदिराच्या परिसरात आपल्याला ब्रम्हकुंड, संत मनामाता समाधी मंदिर इ. चे दर्शन होते. येथील निरव शांतता पाहूनच त्यावेळी संतांनी या स्थानाची तपासाठी निवड केली असावी. कनकेश्वर परिसरातील थंडगार हवा व दाट वनराई याची कोणाला मोहिनी पडली नाही तर नवलंच!
येथील व्याघ्रेश्वर या देव्स्थानावरून कर्नाळा,माणिकगड,सागरगड व खांदेरी-उंदेरी हे दिसतात. पात्रुदेवीच्या मंदिरापासून खाली गेल्यावर समुद्र व मुंबई दिसते. देवस्थानाविषयी जी थोडी फार माहिती मिळाली ती अशी की, पुजा व अर्चा  उत्सवाची व्यवस्था आंग्रे यांच्याकडून होत असें. मंदिरासभोवतालाचा सुमारे १२१ हेक्टर डोंगर व त्यावरील वनस्पतीचे उत्पन्न हे देवासाठी वापरले जात असें. सरकारी दप्तरी हा डोंगर देवाच्या नावे नोंदवलेला आहे. रघुजी आंग्रेनी सवाई माधवराव पेशव्यांकडून १७७६ साली पायथ्याशी असलेले सोगाव हे गाव सर्व हक्कांसह देवस्थानाला इनाम दिले. येथील सर्वात मोठा उत्सव म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला भरणारी जत्रा.
थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. पाऊले थोडीशी जडचं झाली होती निरोप घेताना. “शिव हर शंकर नमामि शंकर” चा जयघोष मनात चालू ठेवत आणि एकदा तरी श्रावण महिन्यात तुझ्या दर्शनाला परत येईन अशी खुणगाठ मनाशी बांधत तिथून तिथून मार्गस्थ झालो...


''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''शंभो'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''

विक्रमादित्य सचिन……………अतुलनीय सचिन………………













-चि-या ३ शब्दांनी संपूर्ण जगामध्ये अशी काही जादू केली आहे कि, या ३ शब्दांमध्ये सर्व क्रिकेट सामावलेले आहे असे वाटते. 
सचिन क्रिकेट मध्ये आल्यानंतर किती आई-वडिलांनी त्यांच्या मुलाचे नाव सचिन ठेवले हे काही वेगळे सांगायची गरज नाही; म्हणजे आपल्या आजूबाजूला एखादी  तरी सचिन नावाची व्यक्ती दिसतेच. असो! सांगावयाचा मुद्दा एवढाच कि ज्याला क्रिकेट मधले फारसे काही काळात नाही त्याला सुद्धा सचिन म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे सचिन एवढे माहिती आहे. 
उदाहरणा दाखल द्यायचं  झालं  तर, अमेरिकेचे अध्यक्ष "बराक ओबामा" एकदा म्हणाले होते कि, I don't know about cricket but still I watch cricket to see Sachin play. Not because I love his play it’s because I want to know the reason why my country's production goes down by 5 percent when he's in batting.”   
खरं तर त्याचावर लिहावे तेवढे कमीच आहे, कारण तो केवळ खेळाडू म्हणून नव्हे तर एक व्यक्ती  म्हणूनही किती चांगला आहे हे सर्वश्रुत आहेच. अतिशय नम्र, विनयशील आणि सदा चेहऱ्यावर स्मित हास्य . त्याच्या या स्मित हास्यावर तरुणी घायाळ नसतील झाल्या तर नवलच आहे. प्रत्येक खेळाडू प्रमाणे त्याच्याही आयुष्यात काही काळ खडतर होता . टीकाकारांनी त्याच्यवर अनेक टीका केल्या पण त्यावर एकही कोणाला शब्द बोलता सगळ्यांची तोंडे आपल्या BAT ने बंद केली. सचिन कधीच मतच जिंकून येत नाही असे मध्यंतरी कोणी म्हणाले होते, आणि त्याच्या दुसरया  दिवशी सचिन ने Sydney मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध रोहित शर्मा बरोबर भागीदारी करून match तर जिंकलीच वरती शतक झळकावून आपला ९० वर बाद होण्याचा अपशकुन हि मोडला.

विक्रमादित्य सचिन:
सचिनच्या नावर किती विक्रम आहेत हे सांगायची गरज नहि. जणू त्याचा जन्म हा क्रिकेट मधील विक्रम करण्यासाठीच झाला अहे. अगदी सगळ्यात जास्त शतकांपासून ते 90’s मध्ये बाद होण्याचा असो किंवा 3rd umpire ने OUT ठरविणारा सगळ्यात पहिला खेळाडू असो. फक्त विक्रमचं विक्रम…
संस्कारशील सचिन:-
कुणा एका व्यक्तीला त्याच्या आयुष्यात इतका मान-सन्मान ,ख्याती,ऐश्वर्य ,सुबत्तता आणि कीर्ती खचितच लाभली असेल, कि जी सचिन ला लाभली अर्थातच त्याच्या पाठीमागे प्रचंड मेहनत आहेच.
FAME,MONEY & JOB SATISFACTION या गोष्टी सहजासहजी एका व्यक्तीला लाभत नाही. पण सचिन हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे आणि हे सर्व असूनही कुठे हि श्रीमंतीच माज नाही कि मोठेपणाच गर्व दिसत नहि. त्याच्या  आईची (रजनी तेंडूलकर )ABP majha वर जेव्हा मुलाखत झाली होती तेव्हा त्याच्यावर त्याच्या घराचे मराठीपणाचे किती संस्कार आहे हे दिसून येते आणि त्यांनी आपल्या निवृतीच्या शेवटच्या केलेल्या भाषणातून तर हे प्रकर्षाने जाणवून येते.
खरं  तर त्याच्यावर मराठी वगैरे इतर कुठल्या जाती-धर्माचे लेबल लावणे योग्य वाटत नहि आणि कुणी लावूही नये पण शेवटी केली केलं तरी आपलं माणूस म्हटल्यावर जर ४ इंच छाती जास्तच फुगते नाही का? खरं तर त्याच्या कर्तुत्वाने तो कधीच त्या पलीकडे गेला आहे त्याची कीर्ती हि दिगंतात पोहोचली आहे आणि हि सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणूनच  त्याला  भारतरत्न पुरस्कार मिळणे क्रमप्राप्त होतं. आई, वडील , भाऊ, पत्नी, मुले , आपले गुरु ,त्याचे सहकारी (specially saurav, Rahul & anil) या सोबत त्याने Media प्रसार माध्यमांचे हि आभार मानले.
सचिन खेळत राहिला देश बदलत गेला:
सचिनच्या Retirement च्या काळात अनेक प्रसार माध्यमांनी जे काही special Reports दाखवले त्यावरून १ गोष्ट जाणवते ती म्हणजे सचिनच्या खेळाबरोबर देश सुद्धा कसा बदलत गेला ते.
·         १९८९ मध्ये सचिन ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पाऊल ठेवले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था जवळपास 319 US$ billion असेल आणि आज जगात चौथ्या स्थानावर आहे.
·         १९८९ मध्ये सोने हे 3300 च्या आसपास होते आणि आज 33,000 ला स्पर्श करत आहे.
·         १९८९ मध्ये मनोरंजाची साधने फारशी नव्हती, commentary सुद्धा RADIO वरून ऐकावी लागत असे, आणि TV तर मोजक्याच घरात होते आणि आज जवळपास प्रत्येक घरात रंगीत TV आहेच पण प्रत्येकाच्या हातात MOBILE खेळतोय आणि INTERNET ने तर क्रांतीच आणली आहे.
·         १९८९ मध्ये फक्त सहकारी बँका अस्तित्वात होत्या, त्यामुळे सर्व व्यवहार करायचे तर रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय नव्हता, सचिन हि कदाचित आपला पहिला चेक वटविण्यासाठी रांगेत उभा राहिला असेल आणि आज एका क्लीक वर सगळे व्यवहार बसल्या जागी शक्य झाले आहेत. 
गर्दी आणि सचिन:
काही वर्षांपूर्वी तो पेणला क्रिकेट मैदानाच्या उदघाटन समारंभासाठी तो येणार हे कळल्यावर आधी खोटे वाटलं  कारण एवढा मोठा खेळाडू आपल्या छोटया शहरात कशासाठी येईल? पण क्रिकेट प्रेम आणि आपल्या चाहत्यांच्या प्रेमापोटी तो आला देखिल. तेव्हा जी काही गर्दी त्याला पाहण्यासाठी/ भेटण्यासाठी उसळी होती ती कमालच ! तेव्हा त्याला पाहण्याची/ भेटण्याची संधी हुकली खरी.  एवढ्या गर्दीत आपला निभाव लागणं अशक्यच कारण सचिन म्हणजे गर्दी हे समीकरणच बनले आहे जणू.
पण पुन्हा  या भारतरत्नाची कधी तर भेट होईल अशी १ छोटी अशा मनात बाळगायला काय हरकत आहे नाही का?.........................................





भावपूर्ण श्रद्धांजली


बाळ केशव ठाकरे
वडील: केशव सीताराम ठाकरे
विवाह: सरला वैद्य (मीनाताई) यांच्याशी
जन्म - 23 जानेवारी 1926 पुणे येथे

1945 - फ्री प्रेसमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू
1960 - मार्मिक साप्ताहिक सुरू
19 जून 1966 - शिवसेनेची स्थापना, दाक्षिणात्यांविरोधात आंदोलन तीव्र
14 ऑगस्ट 1967 - शिवसेनेनं पहिल्यांदा ठाणे महापालिका ताब्यात घेतली
26 ...ार्च 1968 - शिवसेनेचा मुबंई महापालिकेवर भगवा
1970 - वामनराव महाडिक हे शिवसेनेचे पहिले आमदार विधानसभेवर
1971:- Dr. hemchandra gupte मुंबई पालिकेतपहिले महापौर
1973 - सुधीर जोशी मुंबईच्या महापौरपदी
1977 - दादरला सेनाभवनाचं उद्घाटन
1986 - पहिल्यांदाच हिंदुत्वाचा मुद्दा मांडला
23 जानेवारी 1989 - शिवसेनेचं मुखपत्र सामना सुरू
1989 - लोकसभा निवडणुकीसाठी सेना-भाजप युती
1990 - पाकिस्तानी क्रिकेटपटूंना विरोध, शिवसैनिकांनी वानखेडेवर पीच उखडलं
1991 - छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर
1992 - अयोध्येतल्या राम मंदिर उभारणीच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा
1995 - विधानसभेवर भगवा, सेना-भाजप सत्तेत मनोहर जोशी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री
Feb1996:- बायपास surgery by Dr. Nitu mandake
20 April 1996:-मोठा मुलगा बिंदू माधव ठाकरे याचे निधन
सप्टेंबर 1996 - मीनाताई ठाकरें याचे निधन
1999 - केंद्र सरकारमध्ये सहभाग, 13 व्या लोकसभेत शिवसेनेचे 15 खासदार
जुलै 1999 to 10 DEC 2005- निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार बाळासाहेबांना मतदान करायला आणि निवडणूक लढवायला 5 वर्षांची बंदी
2007 - बंदी उठल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांनी पहिल्यांदा मतदान केलं
2002 ते 2004 - लोकसभेच्या सभापतीपदी शिवसेनेचे मनोहर जोशी
2003:- महाबळेश्वर येथील अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्याध्यक्षपद
2005 - नारायण राणेंना शिवसेनेनं पक्षातून काढलं
18 डिसेंबर 2005 - राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्याची घोषणा केली
29 जानेवारी 2007 - इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत हिटलरची प्रशंसा केली
2011 - बाळासाहेबांचा शेवटचा दसरा मेळावा
__________________________________________________________________________
 बाळासाहेब यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली

सगळं सगळं संपलं. बाळासाहेब गेले आणि मराठी माणसाचा आधार, श्वास हरपल्याची भावना अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेची झाली. बाळासाहेबांच्या प्रकृतीस्वस्थ्याचा आढावा सारखा News channel वरून घेताच होतो आणि अचानक संध्याकाळी पाच वाजता बातमी आली कि बाळासाहेब गेले. मन एकदम सुन्न झाले. तिथपासून ते त्यांच्या अंत्य यात्रेपर्यंत सारखा TV चालूच होता. एकदातरी त्यांना भेटावं हि इच्छा कायम मनात होती पण ती शेवटी अपूर्णच राहिली.

आज त्यांच्या अंत्य यात्रेत सुमारे १९-२० लाख लोकं जमा झाली असतील. संपादक निखील वाघळे यांनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरां नंतर ची हि सगळ्यात मोठी अंत्या यात्रा असेल. त्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी केवळ शिवसैनिकच नाही तर सर्वसामान्य जनताही हि केवढी आसुसलेली आहे हेच यावरून दिसत होते. आज अनेक शिवसैनिकांच्या अश्रूंचा बंद फुटला होता.
कोणतंही राजकीय पद न उपभोगता केवळ शिवसेनाप्रमुख एवढंच पद त्यांनी आयुष्यभर स्वीकारलं. मी कधीची माझं आत्मचरित्र लिहिणार नाही किंवा कोणतीही निवडणूक कधीही लढवणार नाही हि त्यांनी घेतलेली शपथ म्हणजे सगळ्या नेत्यासाठी एक आदर्श उदाहरच होतं.
त्यांचा उंचावणारा हात म्हणजे "आदेश"आणि समोर दाखवलेले बोट म्हणजे दिशा एवढंच काय ते शिवसैनिकांना माहित. "मुंबई" बंद हा एक शब्द उच्चारताच त्यांच्या केवळ एका आदेशावर मुंबई बंद होत असे, केवढी हि त्यांच्या शब्दात असलेली ताकद!

आजचा अफाट जनसमुदाय बघताना एवढी लोकप्रियता कोणाच्याही वाट्याला आली नसेल. त्याचं कारण म्हणजे बाळासाहेबांनी राजकारण हे केवळ राजकारणापुरतं ठेवलं होतं आणि त्याही पलीकडे एक उत्तम कलाकार, एक चांगला मित्र, एक उत्तम व्यक्तिमत्व, एक मदतगार अशीच त्यांची ओळख होती.

राजकारण करत असताना त्यांच्यातील कलाकार हा नेहमीच जिवंत होता. ते नेहमी सांगत कि माझं पाहिलं प्रेम म्हणजे व्यंगचित्र. नाट्य,संगीत, कला,क्रीडा आदि क्षेत्रातील उच्च मंडळी हि त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंधांनी जोडली गेली होती. हेचं त्यांच्या यशाचं खरं गमक होतं असं मला वाटतं. अनेक दिग्गज मंडळी हि त्यांना वारंवार भेटी देत असतं यावरूनच त्यांची लोकप्रियता सिद्ध होते.
आपल्या एका इशाऱ्या वर महाराष्ट्राचं किंबहुना देशाचं राजकारण ढवळून टाकण्याची क्षमता या महामानवात होती.

मराठी माणसाला खर्या अर्थाने दिशा दाखवणारी आणि त्यांना एकत्र आणणारी, आणि त्याला ताठ मानेनं जगायला शिकवणारी आणि आपल्या हिंदुत्वाचा, शिवशाहीचा भगवा खऱ्या अर्थाने जिवंत ठेवणारी
एक असामान्य व्यक्ती म्हणजे बाळासाहेब.
मला तरी वाटतं कि बाळासाहेब जर नसते तर "मुंबई" हि कधी मराठी माणसाची राहिलीच नसती. अनेक टीकाकारांनी त्यांच्यावर नको-नको त्या टीका केल्या. पण त्यांनी केलेल्या कार्यामुळे लाखो लोकांना ते नेहमीच आपले वाटले आणि आज दिसणारा हा अथांग महासागर हे सर्व टीकाकारांना त्याचे चोख उत्तर.
Bombay चे "मुंबई" केले, VT चे CST केले शिवसेनेने, Mumbai-Pune Express way चे स्वप्न सुद्धा त्यांनीच प्रत्यक्षात आणले, १ रुपयात झुणका भाकर सारखा स्तुत्य उपक्रम, तसेच अनेक उड्डाणपूल
त्यापासून ते एखाद्या बेरोजगाराला वडापावची गाडी टाकण्यापासून ते त्याला आमदार-खासदार बनवणारा असा हा महापुरुष होता.असा नेता, कलाकार पुन्हा होणे नाही.

बाळासाहेबांवर DAVID LOW या cartoonist चा फार मोठा प्रभाव होता, नव्हे तर दादांनंतर (प्रबोधनकार ठाकरे) david low हेच माझं inspiration होतं, त्याचे एकेक cartoons फार मोठी भाष्य करणारी असत. हिटलर हा जर कोणाला घाबरत होता तर तो याला आणि त्याच्या cartoonsला.असे त्यांनी 5feb2012
ला राजीव खांडेकर यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.
"तुमचे शिक्षण किती?" असं राजीव यांनी त्यांना विचारले, तेच माझं शिक्षण हे सहावी पर्यंतच आणि walt disney वगैरे सगळी मोठी माणसे हि कमी शिकलेली होते असं मिश्किलपणे सांगणारे बाळासाहेब.
IBN lokmat वरती एक मुलाखत चालली होती , त्यामध्ये मेहतारे नावाचे एक व्यंगचित्रकार यांनी बाळासाहेबांची एक आठवण सांगताना सांगितले कि, त्यांच्याकडे एकदा एक मुसलमान बाई आपल्या पोराला घेऊन आली होती मदत मागण्यासाठी. तेव्हा तिच्या मुलाने काढलेली २ चित्र तिने त्यांना दाखवली, ती त्यांना इतकी आवडली कि,तिथूनच त्यांनी एका Industrialist ला फोन लावला आणि त्याला सांगितले कि तुझ्याकडे एक जन paintingsघेऊन येईल,ती तुला लाखाला विकत घ्यायची आहेत. आणि त्या पोरा ला सांगितले जा तुझी सोय झाली आहे, चित्र कला थांबवू नकोस, शिक्षण थांबवू नकोस.
त्यांच्या लोकप्रियतेचा दाखला द्यायचा म्हणजे त्यांच्या निधनाची बातमी समजताच फक्त मुंबईतच नव्हे ठार संपूर्ण महाराष्ट्रात उत्स्फूर्त पणे बंद पाळण्यात आला. त्यांचे आत एक बाहेर एक असे कधीच नव्हते. जे वाटले तेच सडेतोड पाने बोलले.असे धारिष्ट्य कुठल्याही नेत्यात नसेल,असं  एक वादळी व्यक्तिमत्व.

आणखी एक विशेष म्हणजे शिवाजी पार्क आणि त्यांचे असलेले नाते.दरवर्षी शिवाजी पार्क वर होणारा दसरा मेळावा. एकच नेता, एकच व्यासपीठ, एकच जागा आणि हजारोंचा श्रोता हे जणू सलग 47 वर्षे एक समीकरणच बनले होते, एक वर्ल्ड रेकॉर्डच. सहज एक विचार मनाला लावून गेला की, कोर्टाने निर्णय दिल्याप्रमाणे शिवसेनेचा हा शेवटचा दसरा मेळावा असणार होता शिवाजी पार्कवर, त्यामुळे पुढाल्यावर्षी चा दसरा मेळावा दुसर्‍या ठिकाणी कुठे बघणे याच्या आधीच त्यानी आपल्यातून EXIT घेतली.
जिथून त्यांनी सुरुवात केली तिथेच त्यांचा अंत्यविधी झाला हे एक विशेष. त्यांच्याबद्दल नितांत आदर हा माझ्या मनात नेहमीच होता.
खरं तर मी कोणी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही की, कुठल्याही पक्षाशी संबधित नाही,तरीसुद्धा त्यांच्याबद्दल इतके स्वयंस्फुर्तीने लिहावसे वाटले हेच माझे भाग्य. अश्या या महापुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम. ते आज आपल्यात नाही, अजूनही विश्वास वाटत नाही....
बाळासाहेब ...परत या.. महाराष्ट्राला तुमची गरज आहे.........

                                                                                                                                                                                                                                          ... मयुर










सुतार पक्षी


सुतार पक्षी
साळून्कीच्या आकाराएवढा, म्हणजेच २५ ते ३२ से.मी. एवढा हा पक्षी असतो. त्याच्या देखण्या रंगामुळे आणि तितक्याच देखण्या चोचीमुळे एकदा बघितला तरी तो चांगलाच लक्षात राहतो. पुत्रकुळातील हा एकमेव प्रतिनिधी आहे. आपल्या ठाण्य-मुंबईत हा पक्षी सहजासहजी दिसत नाही. मला मात्र हा पक्षी जवळून बघण्याचे भाग्य लाभले तेही माझ्या रायगड  जिल्ह्यात. १ जानेवारी २०१२ ला अलिबाग ला गेलो असताना तिथे मला याचे जवळून दर्शन झाले. तिथे जो मी सुतार पक्षी बघितला तो colorful होता, याच्या आधी  मी फक्त तांबूस रंग असलेला (एक रंगी) सुतार पक्षी बघितला होता, जो साधारणपणे आढळतो.
(Watch Video: http://www.youtube.com/watch?v=7_NUs9hKMC0&feature=plcp)

पण खाली फोटोत दाखवलेला सुतार पक्षी दिसणे खरेच भाग्य!.





सुतार पक्ष्याचा मुख्य रंग पिंगट असतो. त्याच्या पाठीवर,पंखावर आणि शेपटीवर झेब्रा प्राण्यासारखे काले-पांढरे पत्ते असतात. त्याच्या डोक्यावर पिसांचा तुरा असतो. या तुर्याची खासियत म्हणजे सुतार पक्ष्याला तो उघडता किवा मिटता येतो. सुतार पक्ष्याची चोच लांब किवां बाकदार असते. गावाजवळची माळराने, गवताळ भाग, तसंच जंगलात हे पक्षी हिंडताना दिसतात. मात्र त्याच्या रंगामुळे ते निसर्गात चटकन दिसत नाहीत.
सुतार पक्ष्याचं मुख्य अन्न हे अळ्या तसंच अळ्यांचे कोश आहे. या अळ्यांच्या शोधात खरंतर हे पक्षी जमिनीवर किंवा लाकडामध्ये चोच आपटत व पालापाचोळा दूर करीत असल्याचं चित्र पाहायला मिळतं.
त्यांची चोच त्यांना त्यांचं भक्ष्य शोधायला मदत करते म्हणूनच निसर्गाने त्यांना लांब चोचीची देणगी दिली आहे.




जमीन उकरताना ते पार गमतीषित दिसतात. त्यांचा तुरा हा त्यावेळी मिटलेला असतो आणि हा मिटलेला तुरा एखाद्या शेंडीसारखा दिसतो.





 हा  पक्षी  सहसा जोडीने किंवा टोळीने राहतो. याचे गाणे म्हणजे हु....पो.....किंवा हु....पो.....पो....असा आवाज असतो. याच आवाजावरून याला इंग्रजीतले ‘हुप्पो’ हेनाव पडले असावे. त्याचे हे गाणे एकसारखे आणि वेळेला दहा मिनिटे असते. झाडांच्या ढोलीत, भिंतींमधल्या भोकात वा छपराच्या भोकात हा घरटे तयार करतो.

© Mayur H.Sanap 2012