स-चि-नया ३ शब्दांनी संपूर्ण
जगामध्ये अशी काही जादू केली आहे कि, या ३ शब्दांमध्ये सर्व क्रिकेट सामावलेले आहे
असे वाटते.
सचिन क्रिकेट मध्ये आल्यानंतर किती आई-वडिलांनी त्यांच्या मुलाचे नाव सचिन ठेवले हे काही वेगळे सांगायची गरज नाही; म्हणजे आपल्या आजूबाजूला एखादी तरी सचिन नावाची व्यक्ती दिसतेच. असो! सांगावयाचा मुद्दा एवढाच कि ज्याला क्रिकेट मधले फारसे काही
काळात नाही त्याला सुद्धा सचिन म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे सचिन एवढे माहिती
आहे.
उदाहरणा दाखल द्यायचं झालं तर,
अमेरिकेचे अध्यक्ष "बराक ओबामा" एकदा म्हणाले होते कि, I don't know
about cricket but still I watch cricket to see Sachin play. Not because I love
his play it’s because I want to know the reason why my country's production
goes down by 5 percent when he's in batting.”
खरं तर त्याचावर
लिहावे तेवढे कमीच आहे,
कारण तो केवळ
खेळाडू म्हणून नव्हे तर
एक व्यक्ती म्हणूनही किती चांगला
आहे हे सर्वश्रुत
आहेच. अतिशय नम्र,
विनयशील आणि सदा
चेहऱ्यावर स्मित हास्य . त्याच्या
या स्मित हास्यावर
तरुणी घायाळ नसतील
झाल्या तर नवलच
आहे. प्रत्येक खेळाडू
प्रमाणे त्याच्याही आयुष्यात काही
काळ खडतर होता
. टीकाकारांनी त्याच्यवर अनेक टीका
केल्या पण त्यावर
एकही कोणाला शब्द
न बोलता सगळ्यांची
तोंडे आपल्या BAT ने बंद केली. सचिन कधीच मतच जिंकून येत नाही असे मध्यंतरी
कोणी म्हणाले होते, आणि त्याच्या दुसरया दिवशी
सचिन ने Sydney मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध रोहित शर्मा बरोबर भागीदारी करून match तर
जिंकलीच वरती शतक झळकावून आपला ९० वर बाद होण्याचा अपशकुन हि मोडला.
विक्रमादित्य सचिन:
सचिनच्या नावर किती
विक्रम आहेत हे सांगायची गरज नहि. जणू त्याचा जन्म हा क्रिकेट मधील विक्रम करण्यासाठीच
झाला अहे. अगदी सगळ्यात जास्त शतकांपासून ते 90’s मध्ये बाद होण्याचा असो किंवा 3rd
umpire ने OUT ठरविणारा सगळ्यात पहिला खेळाडू असो. फक्त विक्रमचं विक्रम…
संस्कारशील सचिन:-
कुणा एका व्यक्तीला
त्याच्या आयुष्यात इतका मान-सन्मान ,ख्याती,ऐश्वर्य ,सुबत्तता आणि कीर्ती खचितच लाभली
असेल, कि जी सचिन ला लाभली अर्थातच त्याच्या पाठीमागे प्रचंड मेहनत आहेच.
FAME,MONEY &
JOB SATISFACTION या गोष्टी सहजासहजी एका व्यक्तीला लाभत नाही. पण सचिन हे त्याचे मूर्तिमंत
उदाहरण आहे आणि हे सर्व असूनही कुठे हि श्रीमंतीच माज नाही कि मोठेपणाच गर्व दिसत नहि.
त्याच्या आईची (रजनी तेंडूलकर )ABP majha वर
जेव्हा मुलाखत झाली होती तेव्हा त्याच्यावर त्याच्या घराचे मराठीपणाचे किती संस्कार
आहे हे दिसून येते आणि त्यांनी आपल्या निवृतीच्या शेवटच्या केलेल्या भाषणातून तर हे
प्रकर्षाने जाणवून येते.
खरं तर त्याच्यावर मराठी वगैरे इतर कुठल्या जाती-धर्माचे
लेबल लावणे योग्य वाटत नहि आणि कुणी लावूही नये पण शेवटी केली केलं तरी आपलं माणूस
म्हटल्यावर जर ४ इंच छाती जास्तच फुगते नाही का? खरं तर त्याच्या कर्तुत्वाने तो कधीच
त्या पलीकडे गेला आहे त्याची कीर्ती हि दिगंतात पोहोचली आहे आणि हि सर्व भारतीयांसाठी
अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणूनच त्याला भारतरत्न पुरस्कार मिळणे क्रमप्राप्त होतं. आई,
वडील , भाऊ, पत्नी, मुले , आपले गुरु ,त्याचे सहकारी (specially saurav, Rahul
& anil) या सोबत त्याने
Media प्रसार माध्यमांचे हि आभार मानले.
सचिन खेळत राहिला देश बदलत गेला:
सचिनच्या
Retirement च्या काळात अनेक प्रसार माध्यमांनी जे काही special Reports दाखवले त्यावरून
१ गोष्ट जाणवते ती म्हणजे सचिनच्या खेळाबरोबर देश सुद्धा कसा बदलत गेला ते.
·
१९८९ मध्ये
सचिन ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पाऊल ठेवले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था जवळपास
319 US$ billion असेल आणि आज जगात चौथ्या स्थानावर आहे.
·
१९८९ मध्ये
सोने हे 3300 च्या आसपास होते आणि आज 33,000 ला स्पर्श करत आहे.
·
१९८९ मध्ये
मनोरंजाची साधने फारशी नव्हती, commentary सुद्धा RADIO वरून ऐकावी लागत असे, आणि
TV तर मोजक्याच घरात होते आणि आज जवळपास प्रत्येक घरात रंगीत TV आहेच पण प्रत्येकाच्या
हातात MOBILE खेळतोय आणि INTERNET ने तर क्रांतीच आणली आहे.
·
१९८९ मध्ये
फक्त सहकारी बँका अस्तित्वात होत्या, त्यामुळे सर्व व्यवहार करायचे तर रांगेत उभे राहण्याशिवाय
पर्याय नव्हता, सचिन हि कदाचित आपला पहिला चेक वटविण्यासाठी रांगेत उभा राहिला असेल
आणि आज एका क्लीक वर सगळे व्यवहार बसल्या जागी शक्य झाले आहेत.
गर्दी आणि सचिन:
काही
वर्षांपूर्वी तो पेणला क्रिकेट मैदानाच्या उदघाटन समारंभासाठी तो येणार हे कळल्यावर
आधी खोटे वाटलं कारण एवढा मोठा खेळाडू आपल्या
छोटया शहरात कशासाठी येईल? पण क्रिकेट प्रेम आणि आपल्या चाहत्यांच्या प्रेमापोटी तो
आला देखिल. तेव्हा जी काही गर्दी त्याला पाहण्यासाठी/ भेटण्यासाठी उसळी होती ती कमालच
! तेव्हा त्याला पाहण्याची/ भेटण्याची संधी हुकली खरी. एवढ्या गर्दीत आपला निभाव लागणं अशक्यच कारण सचिन
म्हणजे गर्दी हे समीकरणच बनले आहे जणू.
पण पुन्हा
या भारतरत्नाची कधी तर भेट होईल अशी १ छोटी अशा मनात बाळगायला काय हरकत आहे
नाही का?.........................................
No comments:
Post a Comment