मल्हारगडचा सूर्यास्त
आणि
कानिफनाथ
गडावरची
पहाट
|
मल्हारगडचा सूर्यास्त |
बरेच
दिवस झाले होते ट्रेक ला जाऊन. मन
स्वस्थ बसून देत नव्हतं. सारखी ओढ लागली होती
सह्याद्रीमध्ये फिरण्याची. नितेश चल रे!! ट्रेक
ला जाऊया ..
"चल. AMK करूयात."
"नाही
रे बाबा!! AMK नको.
त्यापेक्षा आपण PMK करूयात. "
PMK हे
काय आहे ? नितेश बोलला. मी सहज हसलो
आणि बोललो. पुरंदर,
मल्हारगड आणि कानिफनाथ गड (PMK ) हे करूयात. एका
फेरीत होऊनही जातील.
"हा
रे.. "
AMK च्या वेगळे PMK काहीतरी मी नवीन सांगितल
आणि नितेश लगेच तयार झाला.
महाराष्ट्राच्या
सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून मल्हारगड किल्ला प्रसिद्ध आहे. तो पाहायचाच होता
म्हणून त्यासोबत पुरंदर आणि जमलंच तर कानिफनाथांच्या स्पर्शाने
पावन झालेला कानिफनाथ गड हि करूयात
असं ठरलं.
पुण्याहून
गौरव ची बाईक घ्यायचं
ठरलं.
"अरे..
मयुर भाई किधर गाडी लेके जा
रहे हो मेरी .. पुरानी है
अभि तो पंक्चर निकालके
लाया हूं. साथ नही देगी."
"तू
टेंशन मत
ले । साथ निभाने
वाले भी वैसे हि
है । कुछ होगा तो में देख लुंगा । "
आता
काहीही केलं तरी
मी ऐकणार नाही हे पाहून तो
द्यायला तयार झाला आणि भल्या पहाटेच्या थंडीतआम्ही दोघे पुण्याहून आमच्या नव्या मोहिमेसाठी निघालो.
गडकिल्ल्याच्या
भ्रमंतीला गेल्यानंतर बहुतेक ठिकाणी माझ्या दत्त महाराजांचे मंदिर हे वाटेवर लागतंच असा
माझा तरी आत्तापर्यंतचा अनुभव आहे. पुरंदरच्या वाटेवरही नारायणपूर हे "एकमुखी
दत्त " या मुळे प्रसिद्ध
आहे. सकाळीच तेथून दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो.
सह्याद्रीच्या
दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून
भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट
ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते.
पुरंदर
भारतीय सैन्याच्या ताब्यात असल्याने प्रवेशासाठी आपलं ओळखपत्र दाखवणे गरजेचं आहे.
आपली नोंद केल्यानंतरच आपल्याला आतमध्ये प्रवेश दिला जातो.
भारतीय सैन्याने वरपर्यंत जाण्यासाठी कांक्रीट चा रस्ता बांधला आहे.
वरती जात असतानाच प्रथमच आपल्याला "
वीर मुरारबाजी देशपांडे"
यांच्या स्मारकाचे दर्शन होत.
त्याच्या शौर्याची असीम गाथा आठवली कि आपोआपच अंगावर
शहारे आल्याशिवाय राहत नाहीत.
बाजूलाच एका पाटीवर त्यांच्या पराक्रमाची गाथा संक्षिप्त स्वरूपात लिहिली आहे.
शके
१५८७ (१६५६ साली ) जयसिंग व दिलेरखानाने ४०ते
५० हजार फौजेनिशी पुरंदरला वेढा दिला होता त्यावेळी मुरारबाजी देशपांडे हे किल्लेदार होते.
ते हा होते
फक्त १००० मावळ्यांना सोबत घेऊन. खानाने वज्रगड ताब्यात ठेऊन पुरंदरावर हल्ला केला. मुरारबाजींनी ७०० मावळे घेऊन खानास कडवे प्रत्युत्तर केले. त्यांचे अफलातून शौर्य पाहून खानाने त्यांना आपल्याकडे येण्यास आमंत्रण दिले आणि बोलिला,
"‘अरे
तू कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो.’ ऐसे बोलीता मुरारबाजी बोलिला, ‘तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा
शिपाई तुझा कौल घेतो की काय?’ म्हणोनि
नीट खानावरी चालिला. खानावरी तलवारीचा वार करावा तो खानने आपले
तीन तीर मारून पुरा केला. तो पडला. मग
खानाने तोंडात आंगोळी घातली, ‘असा शिपाई खुदाने पैदा केला."
खानाने
वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा
ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा
राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५
साली इतिहासप्रसिद्ध ‘पुरंदरचा तह’ झाला. यात २३ किल्ले राजांना
मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी,
पुरंदर, रुद्रमाळ
(वज्रगड ) ,कोंढाणा, रोहिडा
लोहगड, विसापूर,
तुंग, तिकोना, प्रबळगड,
माहुली, मनरंजन,
कोहोज, कर्नाळा
सोनगड, पळसगड,
भंडारगड, नरदुर्ग
मार्गगड,
वसंतगड, नंगगड, अंकोला
त्यांच्या
शौर्याची गाथा स्मरून आम्ही पुढे निघालो, भारतीय
सैन्याच्या ताब्यात असल्याने पूर्णपणे किल्ला पाहता येत नाही त्यांनी मार्गिकेल्या वाटेवरूनच आम्ही पुढे निघालो. पुरंदर
किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. सैन्याच्या बांधकामामुळे जरा गडाचा चेहरामोहरा बदलला
आहे . तसेच फतेहबुरुजाकडे जाणारा मार्गही सैन्याने बंद केला होता. कदाचित सुरक्षेच्या कारणामुळे असावा. प्रचंड धुकं असल्याने अंधूकच समोरून वज्रगडाचे दर्शन होत होते. पुरंदर किल्ला हा मजबूत
असून बचावाला जागा उत्तम आहे. एक बाजू सोडली
तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. हे आजही प्रकर्षाने
दिसून येतं. पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर. पुराणात
या डोंगराचे नाव आहे ‘इंद्रनील पर्वत’. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच हा इंद्रनील पर्वत
अशी दंत कथा
विख्यात आहे. पुढे पाण्याची टाकी पाहून आम्ही केदारेश्वर मंदिराकडे निघालो. वर मंदिरात जाण्यासाठी
पायऱ्या या उत्तमस्थितीत आहेत.
केदारेश्वराचे दर्शन घेऊन थोडावेळ आम्ही तिथे विश्रांती घेतली.
|
फतेह बुरुज |
|
केदारेश्वर कडे जाण्याचा मार्ग |
|
केदारेश्वर मंदिरातील नंदी |
|
Trident |
पुरंदरचा इतिहास असा कि, बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण
केले. येथील शेंदऱ्या बुरूज बंधाताना तो सारखा ढासळत
असे. तेव्हा बाहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवाकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा
राहिला. हा किल्ला सन
१४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला.
इ.स. १६४९ मध्ये
आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या
स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात
नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या
पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच
मोठे यश प्राप्त झाले.
सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९
म्हणजेच १२ मे १६५७
गुरुवार या दिवशी संभाजी महाराजांसारख्या तेजस्वी सूर्याच्या छाव्याचा जन्मही याच गडावर झाला होता.
गडावर
थंड हवा फार वाहत होती, टोपी घालण्यासाठी हात खिशात टाकला आणि खाली उतरताना माझ्या लक्षात आलं कि, अरेच्चा आपली टोपी इथेच कुठेतरी पायरीवर पडली. पाठीमागे पहिली तर तिथे नव्हती.
मी नितेश ला जरा नाराजीच्या
स्वरात बोललो,
"अरे यार!! माझी ट्रेकिंग ची आवडती टोपी
उचलली कोणीतरी. "
"अरे
पुरंदरच्या तहात २३ किल्ले गेले.
तर हि तुझी टोपी
काय चीज आहे. चल गेली तर
जाऊ दे आता .. "
हसत
हसत आम्ही उर्वरित गडाचा भाग पाहून खाली उतरलो.
जात-
जात पायथ्याशी असलेल्या पुरंदरेश्वर मंदिरात मी दिवा लावला
आणि शेजारी असलेल्या एका हॉटेल मध्ये मस्त झुणका-
भाकरीचा आस्वाद घेऊन आम्ही मल्हारगडाच्या दिशेने निघालो.
|
Purandareshwar Temple |
|
kedareshwar |
पुरंदर
ते मल्हारगड हडपसर-सासवड मार्गे साधारण २७ किमी. चे
अंतर आहे. मध्यंतरी रस्ता थोडासा
खराब असल्याने मंद गतीनेच आम्ही जात होतो. वाटेवरच माझी नजर एका फलकावर गेली, "चांगदेव तपोभूमी -चांगवटेश्वर मंदिर सासवड ". लगेच नितेशला मी गाडी थांबवायला
सांगितली.
"काय
रे. काय झालं.? "
"अरे
हे बघ इथे कसलं
प्राचीन मंदिर दिसतंय. चांगदेवांचे नाव आहे. चाल पाहुयात." नितेशने गाडी तिकडे वळवली. रस्त्याला लागूनच असलेले हे छानसं शिवाचं मंदिर
आहे. कऱ्हा नदीच्या
तीरावर वसलेल्या या
मंदिराचा परिसर हि अत्यंत रमणीय
आहे. विशेष म्हणजे ते इथली स्वच्छता.
इतर मंदिरासारखी इथे गडबड नाही कि, उगाचच केलेल्या कर्म-कांडाचा मारा
नाही. बाजूच्या कुंडात पाय धुऊन आम्ही आत जाऊन दर्शन
घेतलं. मानलं एक वेगळाच समाधान
मिळालं होत. मंदिराच्या बाजूलाच त्याचा इतिहास लिहिला आहे त्यावरून हे किती प्राचीन
आहे हे समजते.
चांगदेवाचा
जन्मकाळ श्री. ज्ञानेश्वर महाराजांपूर्वी म्हणजे १४०० वर्षे आधीचा. चांगदेव चातुर्मासातील ४ महिने मौनव्रताने
व अंधत्वाने सर्व व्यवहार करत असत. त्यांचे नित्य एक पार्थिव लिंग
पूजेचे असे. त्यांचा शिष्य चिकण मातीने मळून केलेले लिंग डाव्या हातावर ठेवून त्याचा विधियुक्त पूजा करीत असे. एक दिवशी सततच्या
पावसाने कंटाळून शिष्याने एका मोठ्या पालथ्या वाटीवरच थोड्याश्या मातीचे लंपन तयार करून तेच पार्थिव लिंग म्हणून तयार करून ठेवले. चांगदेव नित्य नियमाने स्नान उरकून पार्थिव लिंगास आव्हानात्मक मंत्रोक्षता वाजून ते उचलून हातावर
घेऊ लागले तर ते मुळी
हालेनाच त्यांनी डोळे उघडून पहिले व ते
उचलून
हातावर घेऊ लागले तर ते हालेनाच.
ते हलविले न जाणारे स्वयंभू
लिंगच चांगदेवास दिसून आले. त्याने छोटेसे मंदिर बांधून त्या स्वयंभू लिंगाची उपासना कायम ठेवली यावरून या मंदिरास चांगावटेश्वर असे
नाव पडले.
|
Changavateshwar |
भारतीय
प्राचीन स्थापत्यशास्त्र आणि अप्रतिम शिल्पकला यांचा उत्कृष्ट नमुना असलेले वटेश्वर मंदिर पुर्वाभिमुखी असून प्रवेशद्वारातून प्रवेश केला की,
आतील बाजूस प्रशस्त चौकोनाकृती दगडी प्राकार लागतो,
मंदिराच्या सभामंडपाचे दगडी बांधकाम अप्रतिम आहे.
तीस चौकोनी अखंड पाषाण स्तंभावर सभामंडप उभा आहे.
प्रवेशद्वारावरील स्तंभावर तपस्वी,
दधि-
मंथन करणारी स्त्री,
गरुड,
युगुल,
लढत असलेले मल्ल,
तीन नर्तकी असे शिल्प कोरलेले आहे.
त्याच बरोबर कमल पुष्पे,
शृंखलांच्या माला,
नृत्यांगना यांचे सुबक व कोरीव काम
केलेले दिसते.
सभामंडपाच्या मध्यभागी विशाल व देखणी नंदीची
मूर्ती असून नंदीच्या कंठस्थानी साजरशृंगार कोरलेला आहे.
|
Changavateshwar temple |
सभामंडप
ओलांडून गेल्यावर चौकोनाकृती गाभारा लागतो.
शोडष स्तंभावर हा उभारलेला असून
त्याच्या प्रत्येक स्थंभावर प्रवेशमंडपाप्रमाणेच विविध कलाकुसरयुक्त चित्राकृती,
कमल पुष्पे,
शृंखलांची घडण कोरलेली आहे.
मंडपास दक्षिणोत्तर प्रवेश द्वारे आहेत.
शिवालयाचे गर्भागार नितांतरम्य,
उदात्त नि पवित्र आहे.
त्यामुळे भक्तांच्या मनास सात्विकतेचा अनुभव येतो.
स्वयंभू शिवलिंगाच्या पार्श्वभागी महिरपीच्या कोनाड्यात श्री गणेश देवतेची संगमरवरी रम्य मूर्ती आहे.
मंदिराचा घुमट अष्टकोनी गोलाकार आहे.
पूर्व प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस दोन कृष्णपाषाणी भव्य दीपमाला आहेत.
उत्तरेस पावन कर्
हा तीरावर सखाराम
बापू बोकिलांनी बांधलेला घाट दिसतो.
अशा पुण्यपावन पवित्र शिवालयाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो.
जवळ आलोच आहोत तर संत सोपान
काकांची समाधी पाहूनच पुढे जाऊया म्हणून आम्ही विचारत विचारात त्यांच्या समाधी मंदिरात पोहोचलो.
|
Saint Sopan kaka samadhi temple
|
|
Saint Sopan maharaj |
संत
सोपानदेवांचे मंदिर सासवड गावाच्या एका बाजूस ‘
चांबळी ‘
नदीच्या तीरावर आहे .
मंदिर पूर्वाभिमुख आहे.
मंदिराच्या समोरील आवारातून आम्ही उत्तरेकडून प्रवेश केला.
पायऱ्या चढून महाद्वारात आल्यावर समोरच नागेश्वर मंदिर आहे.
हे नागेश्वर मंदिर
संत सोपान देवांच्या आधीचे असून या मंदिराच्या मागच्या
बाजूस सोपान देवांनी समाधी घेतली असे म्हणतात.
समाधी वर्णनाच्या अभंगात या मंदिराचे वर्णन
आले आहे.
गाभाऱ्यात संत सोपानदेवांची समाधी आहे काळ्या पाषाणातील समाधी हि पायऱ्यांची आहे
.
सकाळी नित्य पूजेनंतर समाधीवर मुखवटा ठेवला जातो.
दुपारी चारच्या सुमारास समाधीस पोशाख होतो.
गाभाऱ्याची प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा सभा मंडपात येताना उजव्या हाताला चिंचेच्या झाडाखालील पादुका दिसल्या.
सोपानदेवांनी ज्या गुहेत समाधी घेतली त्या गुहेचे हे प्रवेशद्वार होते
असे सांगतात.
नंतर हा रस्ता बुजवून
त्यावर पादुकांची स्थापना करण्यात आली.
मंदिर परिसरात एक कुंड असून
यालाच भागीरथी असे म्हणतात.
याच्या जवळूनच जी नदी वाहते
ती चांबळी नदी.
या नदीत एक
मोठा वाटोळा खडक दिसतो त्याला हत्ती खडक असे म्हणतात .
नदीला पाणी असले कि हा खडक
नदीत उतरलेल्या हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो म्हणून हे नाव पडले
असावे कदाचित.
नदीच्या पलीकडे पुंडलिक मंदिर आहे .
दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराचा आता
जीर्णोद्धार झाला असून त्यासमोर सिमेंटचा मंडप व ओटा बांधला
आहे.
नंतर
आम्ही निघालो ते पुरंदरे वाडा
पाहण्यासाठी येथूनच अगदी काही पावलांच्या अंतरावर तो आहे. कर्हेकाठवरील
पुरंदरे घराण्याचे संस्थापक व पेशव्यांचे दिवाण
अंबाजीपंत पुरंदरे यांनी १७१० मध्ये हा पुरंदरे वाडा
बांधला. सध्य स्थितीत त्याची अवस्था फारशी चांगली नाही. वाड्याच्या बाहेरचा परिसरहि थोडा
अस्वच्छ आहे यावरूनच नामशेष होणारी वाडा संस्कृती आणि आपला जपला जाणारा पूर्वजांचा स्वाभिमान किती लयाला गेला आहे याची जाणीव होते.
|
दुरून दिसणारा मल्हारगड |
नंतर
आम्ही कूच केलं ते थेट मल्हार
गडाकडे.
महाराष्ट्राच्या
सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून मल्हारगड किल्ला प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे गावातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगररांग ही पूर्व-पश्चिम
पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच
रांगेवर आहेत. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याचे बांधकाम
हे इ .स. १७६३
ते १७६५ या काळात झाले.
पेशव्याचे तोफखान्याचे प्रमुख भीमावर पानसे व कृष्णराव पानसे
यांनी गावच्या उत्तरेकडील डोंगरावर याची निर्मिती केली म्हणून याला सोनोरीचा किल्ला असेही म्हणतात.
सासवड
पासून ६ कि.
मी.
वर सोनोरी हे गाव आहे.
सोनोरी गावातून समोरच दिसणारा मल्हारगड आपले लक्ष वेधून घेतो.
तसेच हडपसर-
सासवड -
जेजुरी या मुख्य महामार्गापासून
सोनोरी गावाकडे जाण्यासाठी काळेवाडी फाटा लागतो.
तो आपल्याला थेट
मल्हारगडच्या मागच्या बाजूला घेऊन जातो.
दक्षिणेकडील पडलेल्या बुरूजा पर्यंत पोहोचण्याचा हा सर्वात सोपा
मार्ग आहे.
काळेवाडी गावातून जाणारा हा रस्ता फारसा
परिचित नसला तरीही अतिशय सोपा आहे.
रस्ता थोडा कच्चा असला तरी देखील सहज किल्ल्याच्या बुरुजापर्यंत आपल्याला सहज घेऊन जातो.
याच मार्गे संध्याकाळी ४ च्या सुमारास
आम्ही मल्हारगडच्या पायथ्याशी पोहोचलो.
येथूनच फक्त ५ मिनिटांच्या चढाईनेच
आम्ही किल्ल्यात प्रवेश केला.
|
Khandoba temple |
मल्हारगड
प्रशस्त आणि मोकळा ढाकळा आहे. समोरच असलेलं पाण्याचे
टाकं पाहून
आम्ही मोकळ्या असणाऱ्या पठारातून बालेकिल्ल्यात प्रवेश केला.
गडाचा
सर्वात प्रेक्षणीय भाग हा बालेकिल्ला आहे.
मल्हारगड हा साधारण त्रिकोणी
आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. बालेकिल्ल्यातील वास्तू पडल्या असून आता फक्त अवशेष राहिले आहेत. बालेकिल्ल्यात दोन मंदिरे आहेत. आकाराने मोठे मंदिर रेखीव शिवलिंग असलेले सावळेश्वराचे आहे. कुठेही
गडावर गेलो कि तेथील मंदिरात
दिवाबत्ती करायची हा माझा शिरस्ता
मी इथेही पार पडला. दुसऱ्या लहान मंदिरात अश्वारूढ मल्हारीची म्हाळसासोबतची मूर्ती आहे. या मंदिरातील मूर्ती
पाहून मला जेजुरीच्या खंडोबाची आठवण झाली. यावरूनच किल्ल्याचे नाव मल्हारगड पडले. त्याचा इतिहास असा कि,
किल्ला
बांधत असताना एका ठिकाणी कुदळीचा घाव
घातल्यावर रक्त वाहू लागले. सरदार पानसेंनी खंडोबाला साकडे घातले आणि किल्ल्यावर मंदिर बांधण्याचा संकल्प केला. म्हणून या किल्ल्याला त्यांनी
मल्हारगड नाव दिल्याची दंतकथा प्रचलित आहे. इंग्रजांच्या विरुद्ध बंडात उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी या गडाचा आश्रय
घेतला होता असे म्हणतात. बालेकिल्ल्याच्या उत्तरेला प्रवेशद्वार आहे. ते पाहण्यासारखे आहे.
थोडा वेळ थांबून २-४ मिनटे
फोटोसेशन करून किल्ल्याच्या तटबंदीने पूर्ण किल्ला पाहून आम्ही पाहून घेतला. किल्याला
असणारी हि तटबंदी साधारण
११०० मीटर लांबी असलेली दुहेरी तटबंदी आहे. एव्हाना
सूर्यास्त होत आलेला. संपूर्ण गडावरून सूर्यास्ताचे अनोखा नजर दिसत होता. पश्चिमेला बुरुजाच्या पलीकडून सूर्यनारायण हळूहळू मावळतीला जात होते. मराठेशाहीच्या या शेवटच्या बांधलेल्या किल्ल्यावरून
दिसणारे हे दृश्य म्हणजे
जणू काही मराठेशाहीच्या सूर्यास्ताचीच साक्ष देत होते.
आता
आमचा तिसरा मुक्काम होता तो कानिफनाथ गड.
आधी रात्रीची वस्ती मल्हारगडावर करायचे ठरवले होतं पण का कुणास
ठाऊक कानिफनाथ गडावर जायची एक अनामिक ओढ
लागली होती. आजचा मुक्काम कानिफनाथगडावरच करायचा असं ठरवून आम्ही तिकडे प्रस्थान केलं.
|
Kanifnath gadh |
कानिफनाथ
गड सह्याद्रिच्या पर्वतरांगामध्ये सासवडच्या पश्चिमेला बोपगांव येथे आहे. पुण्यावरून दिवे घाट मार्गे सासवड हे शहर सुमारे
२८ कि.मी. वर
आहे व हडपसर
पासून सुमारे १७ कि.मी.
सासवड शहरापासून पश्चिमेकडे कोंढव्या कडे जाताना ९ कि.मी
वर बोपगाव या गावानजीक कानिफनाथ
मंदिराकडे जायला एक फाटा आहे.
४-५ कि.मी
चा प्रवास व एक छोटा
घाट चढून गेल्यास कानिफनाथ मंदिरा पर्यंत पोहचता येते. आम्ही मात्र सासवडहून बोपदेव -पुणे मार्गे
कानिफनाथ गडाकडे पोहोचलो.
कानिफनाथगडावर
कानिफनाथ यांचे फार सुंदर मंदिर आहे. मंदिर प्राचिनकालीन आहे.हे मंदिर त्या
पंचक्रोशितील शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या चढून आम्ही वरती गेलो. मंदिर म्हणजे एक छोटी गुहाच
आहे. मंदिरातील गाभारा मोठा आहे. परंतु प्रवेश दरवाजा १×१ फुट
असा आहे. मी कुतुहुलाने पाहत
होतो. एवढ्याश्या जागेमधून भाविक आत मध्ये कसे
जात आहेत. तेथील पुजाऱ्याने एक युक्ती सांगितली
आणि दोन हात कानालगत लावून आत सरपटत प्रवेश
करायचा असतो आणि येताना सुद्धा तसेच आधी पाय बाहेर ठेऊन सरपटत बाहेर यावे लागतं नाहीतर
मग सगळं कठीणचं
स्त्रियांना
आत गाभाऱ्यात जाण्यास मज्जाव आहे. इथे आत गाभाऱ्यात शिरण्यापूर्वी
शर्ट, बनियन, बेल्ट काढून आत शिरावे लागते.
मी आत मध्ये प्रवेश
केला. आतमध्ये कानिफनाथांची समाधी आहे. थोडा वेळ थांबून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन बाहेर आलो. मनाला एक वेगळीच प्रसन्नता
वाटत होती. रात्रीच्या वेळी इथल्या परिसरातले एक वेगळच भारलेलं
वातावरण वाटत होतं. मंदिर परिसरातून लांबवर शहरातील दिसणाऱ्या दिव्याचा झगमगाट दिसत होता.
मंदिराच्या
गाभाऱ्याच्या वर एक वाक्य
आपले लक्ष वेधून घेतं.
"असे
श्रद्धा ज्याच्या उरी । त्यासी दिसे
हा कानिफा मुरारी । "
कुठेतरी
वाचल्यासारखं वाटतंय ना! अरेच्चा हे तर आपल्याला
उसाच्या रसवंती गृहाच्या वर दिसतं नेहमी.
नितेश बोलला. संपूर्ण महाराष्ट्र कुठेही गेलात तरी प्रत्येक रसवंती गृहावर हे वाक्य लिहिलेलं
असतंच. त्याची गोष्ट अशी आहे कि,
आता
आमचा तिसरा मुक्काम होता तो कानिफनाथ गड.
आधी रात्रीची वस्ती मल्हारगडावर करायचे ठरवले होतं पण का कुणास
ठाऊक कानिफनाथ गडावर जायची एक अनामिक ओढ
लागली होती. आजचा मुक्काम कानिफनाथगडावरच करायचा असं ठरवून आम्ही तिकडे प्रस्थान केलं.
कानिफनाथ
गड सह्याद्रिच्या पर्वतरांगामध्ये सासवडच्या पश्चिमेला बोपगांव येथे आहे. पुण्यावरून दिवे घाट मार्गे सासवड हे शहर सुमारे
२८ कि.मी. वर
आहे व हडपसर
पासून सुमारे १७ कि.मी.
सासवड शहरापासून पश्चिमेकडे कोंढव्या कडे जाताना ९ कि.मी
वर बोपगाव या गावानजीक कानिफनाथ
मंदिराकडे जायला एक फाटा आहे.
४-५ कि.मी
चा प्रवास व एक छोटा
घाट चढून गेल्यास कानिफनाथ मंदिरा पर्यंत पोहचता येते. आम्ही मात्र सासवडहून बोपदेव -पुणे मार्गे
कानिफनाथ गडाकडे पोहोचलो.
कानिफनाथगडावर
कानिफनाथ यांचे फार सुंदर मंदिर आहे. कानिफनाथ येथे तपश्चर्येला बसले होते असे मानतात. मंदिर प्राचिनकालीन आहे.हे मंदिर त्या
पंचक्रोशितील शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या चढून आम्ही वरती गेलो. मंदिर म्हणजे एक छोटी गुहाच
आहे. मंदिरातील गाभारा मोठा आहे. परंतु प्रवेश दरवाजा १×१ फुट
असा आहे. मी कुतुहुलाने पाहत
होतो. एवढ्याश्या जागेमधून भाविक आत मध्ये कसे
जात आहेत. तेथील पुजाऱ्याने एक युक्ती सांगितली
आणि दोन हात कानालगत लावून आत सरपटत प्रवेश
करायचा असतो आणि येताना सुद्धा तसेच आधी पाय बाहेर ठेऊन सरपटत बाहेर यावे लागतं नाहीतर मग सगळं कठीणचं
स्त्रियांना
आत गाभाऱ्यात जाण्यास मज्जाव आहे. इथे आत गाभाऱ्यात शिरण्यापूर्वी
शर्ट, बनियन, बेल्ट काढून आत शिरावे लागते.
मी आत मध्ये प्रवेश
केला. आतमध्ये कानिफनाथांची समाधी आहे. थोडा वेळ थांबून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन बाहेर आलो. मनाला एक वेगळीच प्रसन्नता
वाटत होती. रात्रीच्या वेळी इथल्या परिसरातले एक वेगळच भारलेलं
वातावरण वाटत होतं. मंदिर परिसरातून लांबवर शहरातील दिसणाऱ्या दिव्याचा झगमगाट दिसत होता.
मंदिराच्या
गाभाऱ्याच्या वर एक वाक्य
आपले लक्ष वेधून घेतं.
"असे
श्रद्धा ज्याच्या उरी । त्यासी दिसे
हा कानिफा मुरारी । "
कुठेतरी
वाचल्यासारखं वाटतंय ना! अरेच्चा ! हे तर आपल्याला
उसाच्या रसवंती गृहाच्या वर नेहमी दिसतं
. नितेश बोलला. संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही गेलात तरी प्रत्येक रसवंती गृहावर हे वाक्य लिहिलेलं
असतंच. बरोबर. त्याची गोष्ट अशी आहे कि,
साधारण
७०-८० च्या दशकात
पुरंदर तालुक्यातील बोपगाव गावातील एक तरुण रोजगारासाठी
मुंबई ला गेला. त्याला
कळलं कि
इथं आपल्या उसाला भरपूर मागणी आहे. मग दारोदारी जाऊन
ते विकण्यापेक्षा एका जागी दुकान थाटून रस काढून ते
विकावं असं त्याच्या मनात आलं. पुरंदरच्या गोड उसाच्या रसाने मुंबईत जादू केली आणि हळू हळू बोपगाव,सासवड आणि इतर परिसरातील लोक हे त्या उद्योगासाठी
महाराष्ट्रभर पसरले. त्यांच्या धंद्यातील खरेपणाने रसवंतीला एक ब्रँड बनवलं.
अख्खा पुरंदर तालुका हा नवनाथांचा भक्त
आहे. त्यांची कानिफनाथावर खूप श्रद्धा. इथली माणसं जगभर पसरली पण आपल्या मातीला
विसरली नाहीत. त्यांनी श्रद्धेने आपल्या रसवंती गृहाचं नावं
"कानिफनाथ रसवंती गृह " असं ठेवलं. यांचं यश पाहून इतर
रसवंती वाले देखील हेच नाव ठेवू लागले. पूर्वी बैलांनी फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर हे रस काढलं
जायचं परंतु काळाच्या ओघात ते गेलं आणि
आता मशिनी आल्या तरी एकेकाळी या बैलांनी आपल्याला
जगवलं याची आठवण शेतकऱ्यांच्या पोरांनी कायम ठेवली ती बैलाच्या गळ्यातले
घुंगरू मशीनला बांधून . ते आजही छूम-छूम करत मशीनवर फिरत आहेत. कितीही शीतपेय बाजारात आली तरी उसाच्या रसाची लोकप्रियता काही कमी होणारी नाही.
त्यांची
हि अपार श्रध्दा पाहून आम्हीही नतमस्तक होऊन बाहेर आलो आणि इथल्या विश्वस्तांना सांगितल्यावर त्यांनी आम्हाला गडावर रहायची परवानगी दिली.
रात्रीची थंडी खूप वाढत होती.
माझ्याकडे असलेल्या स्लीपिंग बॅग मुळे माझा तर निभाव लागला
पण नितेश मात्र पक्का गारठला होता.
पहाटे आरतीच्या होणाऱ्या आवाजाने जाग आली.
सूर्यनारायणाने हळू हळू दर्शन द्यायला सुरुवात केली होती.
गडावरून
दिसणारा सूर्योदयाचा नजारा फार छान होता.
पुन्हा एकदा नाथांचे दर्शन घेऊन आम्ही सकाळच्या गारठणार्या थंडीतुन परतीचा मार्ग पकडला.
एक वेगळा अनुभव
घेऊन आमचा PMK
चा प्रवास पूर्ण
झाला होता.
© Mayur H. Sanap