बाळ केशव
ठाकरे
वडील:
केशव सीताराम ठाकरे
विवाह:
सरला वैद्य (मीनाताई)
यांच्याशी
जन्म - 23 जानेवारी 1926 पुणे येथे
जन्म - 23 जानेवारी 1926 पुणे येथे
1945 - फ्री
प्रेसमध्ये व्यंगचित्रकार
म्हणून रुजू
1960 - मार्मिक
साप्ताहिक सुरू
19 जून 1966
- शिवसेनेची स्थापना,
दाक्षिणात्यांविरोधात
आंदोलन तीव्र
14 ऑगस्ट
1967 - शिवसेनेनं
पहिल्यांदा ठाणे महापालिका
ताब्यात घेतली
26 म...ार्च
1968 - शिवसेनेचा मुबंई
महापालिकेवर भगवा
1970 - वामनराव
महाडिक हे शिवसेनेचे पहिले
आमदार विधानसभेवर
1971:- Dr. hemchandra gupte मुंबई
पालिकेतपहिले महापौर
1973 - सुधीर
जोशी मुंबईच्या महापौरपदी
1977 - दादरला
सेनाभवनाचं उद्घाटन
1986 - पहिल्यांदाच
हिंदुत्वाचा मुद्दा मांडला
23 जानेवारी
1989 - शिवसेनेचं मुखपत्र
सामना सुरू
1989 - लोकसभा
निवडणुकीसाठी सेना-भाजप
युती
1990 - पाकिस्तानी
क्रिकेटपटूंना विरोध,
शिवसैनिकांनी वानखेडेवर
पीच उखडलं
1991 - छगन
भुजबळ शिवसेनेतून बाहेर
1992 - अयोध्येतल्या
राम मंदिर उभारणीच्या आंदोलनाला
ठाम पाठिंबा
1995 - विधानसभेवर
भगवा, सेना-भाजप
सत्तेत मनोहर जोशी शिवसेनेचे
पहिले मुख्यमंत्री
Feb1996:- बायपास
surgery by Dr. Nitu mandake
20 April 1996:-मोठा
मुलगा बिंदू माधव ठाकरे याचे
निधन
सप्टेंबर 1996 - मीनाताई ठाकरें याचे निधन
सप्टेंबर 1996 - मीनाताई ठाकरें याचे निधन
1999 - केंद्र
सरकारमध्ये सहभाग, 13 व्या
लोकसभेत शिवसेनेचे 15 खासदार
जुलै 1999
to 10 DEC 2005- निवडणूक आयोगाच्या
शिफारशीनुसार बाळासाहेबांना
मतदान करायला आणि निवडणूक
लढवायला 5 वर्षांची
बंदी
2007 - बंदी
उठल्यानंतर मुंबई महापालिका
निवडणुकीत बाळासाहेबांनी
पहिल्यांदा मतदान केलं
2002 ते 2004
- लोकसभेच्या सभापतीपदी
शिवसेनेचे मनोहर जोशी
2003:- महाबळेश्वर
येथील अधिवेशनात उद्धव ठाकरे
यांच्याकडे कार्याध्यक्षपद
2005 - नारायण राणेंना शिवसेनेनं पक्षातून काढलं
2005 - नारायण राणेंना शिवसेनेनं पक्षातून काढलं
18 डिसेंबर
2005 - राज ठाकरेंनी
शिवसेना सोडल्याची घोषणा
केली
29 जानेवारी
2007 - इंडियन एक्सप्रेसला
दिलेल्या मुलाखतीत हिटलरची
प्रशंसा केली
2011 - बाळासाहेबांचा
शेवटचा दसरा मेळावा
__________________________________________________________________________
बाळासाहेब यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली
सगळं सगळं
संपलं. बाळासाहेब
गेले आणि मराठी माणसाचा आधार,
श्वास हरपल्याची भावना
अख्ख्या महाराष्ट्राच्या
जनतेची झाली. बाळासाहेबांच्या
प्रकृतीस्वस्थ्याचा आढावा
सारखा News channel वरून
घेताच होतो आणि अचानक संध्याकाळी
पाच वाजता बातमी आली कि बाळासाहेब
गेले. मन एकदम सुन्न
झाले. तिथपासून ते
त्यांच्या अंत्य यात्रेपर्यंत
सारखा TV चालूच होता.
एकदातरी त्यांना
भेटावं हि इच्छा कायम मनात
होती पण ती शेवटी अपूर्णच
राहिली.
आज त्यांच्या अंत्य यात्रेत सुमारे १९-२० लाख लोकं जमा झाली असतील. संपादक निखील वाघळे यांनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरां नंतर ची हि सगळ्यात मोठी अंत्या यात्रा असेल. त्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी केवळ शिवसैनिकच नाही तर सर्वसामान्य जनताही हि केवढी आसुसलेली आहे हेच यावरून दिसत होते. आज अनेक शिवसैनिकांच्या अश्रूंचा बंद फुटला होता.
कोणतंही राजकीय पद न उपभोगता केवळ शिवसेनाप्रमुख एवढंच पद त्यांनी आयुष्यभर स्वीकारलं. मी कधीची माझं आत्मचरित्र लिहिणार नाही किंवा कोणतीही निवडणूक कधीही लढवणार नाही हि त्यांनी घेतलेली शपथ म्हणजे सगळ्या नेत्यासाठी एक आदर्श उदाहरच होतं.
त्यांचा
उंचावणारा हात म्हणजे "आदेश"आणि
समोर दाखवलेले बोट म्हणजे
दिशा एवढंच काय ते
शिवसैनिकांना माहित. "मुंबई"
बंद हा एक शब्द उच्चारताच
त्यांच्या केवळ एका आदेशावर
मुंबई बंद होत असे, केवढी
हि त्यांच्या शब्दात असलेली
ताकद!
आजचा अफाट
जनसमुदाय बघताना एवढी लोकप्रियता
कोणाच्याही वाट्याला आली
नसेल. त्याचं कारण
म्हणजे बाळासाहेबांनी राजकारण
हे केवळ राजकारणापुरतं ठेवलं
होतं आणि त्याही पलीकडे एक
उत्तम कलाकार, एक
चांगला मित्र, एक
उत्तम व्यक्तिमत्व, एक
मदतगार अशीच त्यांची ओळख
होती.
राजकारण
करत असताना त्यांच्यातील
कलाकार हा नेहमीच जिवंत होता.
ते नेहमी सांगत कि
माझं पाहिलं प्रेम म्हणजे
व्यंगचित्र. नाट्य,संगीत,
कला,क्रीडा
आदि क्षेत्रातील उच्च मंडळी
हि त्यांच्याशी मैत्रीपूर्ण
संबंधांनी जोडली गेली होती.
हेचं त्यांच्या यशाचं
खरं गमक होतं असं मला वाटतं.
अनेक दिग्गज मंडळी
हि त्यांना वारंवार भेटी देत
असतं यावरूनच त्यांची लोकप्रियता
सिद्ध होते.
आपल्या
एका इशाऱ्या वर महाराष्ट्राचं
किंबहुना देशाचं राजकारण
ढवळून टाकण्याची क्षमता या
महामानवात होती.
मराठी
माणसाला खर्या अर्थाने दिशा
दाखवणारी आणि त्यांना एकत्र
आणणारी, आणि त्याला
ताठ मानेनं जगायला शिकवणारी
आणि आपल्या हिंदुत्वाचा,
शिवशाहीचा भगवा खऱ्या
अर्थाने जिवंत ठेवणारी
एक असामान्य व्यक्ती म्हणजे बाळासाहेब.
एक असामान्य व्यक्ती म्हणजे बाळासाहेब.
मला तरी
वाटतं कि बाळासाहेब जर नसते
तर "मुंबई"
हि कधी मराठी माणसाची
राहिलीच नसती. अनेक
टीकाकारांनी त्यांच्यावर
नको-नको त्या टीका
केल्या. पण त्यांनी
केलेल्या कार्यामुळे लाखो
लोकांना ते नेहमीच आपले वाटले
आणि आज दिसणारा हा अथांग महासागर
हे सर्व टीकाकारांना त्याचे
चोख उत्तर.
Bombay चे
"मुंबई" केले,
VT चे CST केले
शिवसेनेने, Mumbai-Pune Express way चे
स्वप्न सुद्धा त्यांनीच
प्रत्यक्षात आणले, १
रुपयात झुणका भाकर सारखा
स्तुत्य उपक्रम, तसेच
अनेक उड्डाणपूल
त्यापासून
ते एखाद्या बेरोजगाराला
वडापावची गाडी टाकण्यापासून
ते त्याला आमदार-खासदार
बनवणारा असा हा महापुरुष
होता.असा नेता,
कलाकार पुन्हा होणे
नाही.
बाळासाहेबांवर
DAVID LOW या cartoonist चा
फार मोठा प्रभाव होता, नव्हे
तर दादांनंतर (प्रबोधनकार
ठाकरे) david low हेच माझं
inspiration होतं, त्याचे
एकेक cartoons फार मोठी
भाष्य करणारी असत. हिटलर
हा जर कोणाला घाबरत होता तर
तो याला आणि त्याच्या cartoonsला.असे
त्यांनी 5feb2012
ला राजीव
खांडेकर यांना दिलेल्या
मुलाखतीत म्हटले होते.
"तुमचे शिक्षण किती?" असं राजीव यांनी त्यांना विचारले, तेच माझं शिक्षण हे सहावी पर्यंतच आणि walt disney वगैरे सगळी मोठी माणसे हि कमी शिकलेली होते असं मिश्किलपणे सांगणारे बाळासाहेब.
"तुमचे शिक्षण किती?" असं राजीव यांनी त्यांना विचारले, तेच माझं शिक्षण हे सहावी पर्यंतच आणि walt disney वगैरे सगळी मोठी माणसे हि कमी शिकलेली होते असं मिश्किलपणे सांगणारे बाळासाहेब.
IBN lokmat वरती
एक मुलाखत चालली होती ,
त्यामध्ये मेहतारे
नावाचे एक व्यंगचित्रकार
यांनी बाळासाहेबांची एक आठवण
सांगताना सांगितले कि,
त्यांच्याकडे एकदा
एक मुसलमान बाई आपल्या पोराला
घेऊन आली होती मदत मागण्यासाठी.
तेव्हा तिच्या मुलाने
काढलेली २ चित्र तिने त्यांना
दाखवली, ती त्यांना
इतकी आवडली कि,तिथूनच
त्यांनी एका Industrialist ला
फोन लावला आणि त्याला सांगितले
कि तुझ्याकडे एक जन paintingsघेऊन
येईल,ती तुला लाखाला
विकत घ्यायची आहेत. आणि
त्या पोरा ला सांगितले जा तुझी
सोय झाली आहे, चित्र
कला थांबवू नकोस, शिक्षण
थांबवू नकोस.
त्यांच्या
लोकप्रियतेचा दाखला द्यायचा
म्हणजे त्यांच्या निधनाची
बातमी समजताच फक्त मुंबईतच
नव्हे ठार संपूर्ण महाराष्ट्रात
उत्स्फूर्त पणे बंद पाळण्यात
आला. त्यांचे आत एक
बाहेर एक असे कधीच नव्हते.
जे वाटले तेच सडेतोड
पाने बोलले.असे
धारिष्ट्य कुठल्याही नेत्यात
नसेल,असं एक वादळी व्यक्तिमत्व.
आणखी एक
विशेष म्हणजे शिवाजी पार्क
आणि त्यांचे असलेले नाते.दरवर्षी
शिवाजी पार्क वर होणारा दसरा
मेळावा. एकच नेता,
एकच व्यासपीठ, एकच
जागा आणि हजारोंचा श्रोता हे
जणू सलग 47 वर्षे एक
समीकरणच बनले होते, एक
वर्ल्ड रेकॉर्डच. सहज
एक विचार मनाला लावून गेला
की, कोर्टाने निर्णय
दिल्याप्रमाणे शिवसेनेचा
हा शेवटचा दसरा मेळावा असणार
होता शिवाजी पार्कवर,
त्यामुळे पुढाल्यावर्षी
चा दसरा मेळावा दुसर्या
ठिकाणी कुठे बघणे याच्या आधीच
त्यानी आपल्यातून EXIT घेतली.
जिथून
त्यांनी सुरुवात केली तिथेच
त्यांचा अंत्यविधी झाला हे
एक विशेष. त्यांच्याबद्दल
नितांत आदर हा माझ्या मनात
नेहमीच होता.
खरं तर मी
कोणी कुठल्याही पक्षाचा
कार्यकर्ता नाही की, कुठल्याही
पक्षाशी संबधित नाही,तरीसुद्धा
त्यांच्याबद्दल इतके
स्वयंस्फुर्तीने लिहावसे
वाटले हेच माझे भाग्य. अश्या
या महापुरुषाला माझे कोटी
कोटी प्रणाम. ते आज
आपल्यात नाही, अजूनही
विश्वास वाटत नाही....
बाळासाहेब ...परत या.. महाराष्ट्राला तुमची गरज आहे.........
... मयुर
बाळासाहेब ...परत या.. महाराष्ट्राला तुमची गरज आहे.........
... मयुर